Accommodation meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Accommodation meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Accommodation’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Accommodation’ चा उच्चार= अकामडेशन

Accommodation meaning in Marathi

‘Accommodation’ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत.

1. ‘Accommodation’ म्हणजे राहण्याची जागा, जसे की खोली, हॉटेल, तात्पुरती निवास व्यवस्था, भाड्याने घेतलेली निवास व्यवस्था इत्यादी.

2. विविध लोक, गट, समूह, देश किंवा राज्यांमधील समझोता किंवा तडजोड .

3. एखाद्याशी किंवा कशाशी तरी जुळवून (adapting) घेण्याची किंवा समायोजित (adjusting) करून घेण्याची क्रिया.

Accommodation- Noun (संज्ञा, नाम)
निवास
निवास स्थान
स्थान
राहण्याची जागा
राहण्याची सोय
सोय
तडजोड
समायोजन
जुळवून घेणे

Accommodation-Example

‘Accommodation’ हा शब्द noun (संज्ञा, नाम) या रुपात कार्य करतो. 

‘Accommodation’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Accommodations’ आहे.

‘Accommodation’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: University provided accommodation to foreign students.
Marathi: विद्यापीठाने परदेशी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केली.

English: I wish I had accommodation at the seaside.
Marathi: माझी इच्छा आहे की माझे समुद्राजवळ घर असावे.

English: We need accommodation for two days.
Marathi: आम्हाला दोन दिवस राहण्या साठी निवासाची गरज आहे.

English: Food and accommodation are provided by the company to their employees.
Marathi: कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जेवण आणि निवास व्यवस्था पुरवली जाते.

English: This building has accommodation for all religious people.
Marathi: या इमारतीत सर्व धर्मीय लोकांसाठी राहण्याची सोय आहे.

English: Usually, people like accommodation of low rent.
Marathi: सामान्यतः लोक कमी भाड्याच्या निवासस्थानाला प्राधान्य देतात.

See also  Accusation meaning in English | Simple explanation | Hindi Meaning

English: ‘Accommodation’ means buildings or rooms where people live or stay.
Marathi: ‘Accommodation’ म्हणजे इमारत किंवा खोल्या जिथे लोक राहतात.

English: ‘Accommodation’ means a place, such as a room, hotel, lodge, or rented place where peoples stay or live.
Marathi: ‘Accommodation’ म्हणजे राहण्याची जागा, जसे की खोली, हॉटेल, लॉज किंवा भाड्याने घेतलेली जागा जिथे लोक राहतात.

English: Ukraine’s prime minister was seeking accommodation with Russia to avoid war.
Marathi: युक्रेनचे पंतप्रधान युद्ध टाळण्यासाठी रशियाशी समेट घडवून आणू पाहत होते.

English: Ukraine sought accommodation with Russia.
Marathi: युक्रेनने रशियाशी तडजोड करण्याची मागणी केली.

English: We reached an accommodation between both parties.
Marathi: आम्ही दोन्ही बाजूंनी एक तडजोड केली.

English: Accommodation of 50 people on the boat was not possible.
Marathi: बोटीवर 50 जण बसणे शक्य नव्हते.

‘Accommodation’ चे इतर अर्थ

hostel accommodation= वसतिगृह निवास

request accommodation= निवासासाठी विनंती, निवासस्थाना साठी विनंती 

accommodation bill= निवास बिल

accommodation time= मुक्काम वेळ

temporary accommodation= तात्पुरती निवास व्यवस्था

accommodation wanted= निवास हवा होता, राहण्याची जागा हवी होती 

accommodation of eye= दूरच्या आणि जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याची डोळ्याची क्षमता

residential accommodation= निवासी निवास व्यवस्था

financial accommodation= कर्जाचा एक प्रकार ज्यामध्ये कर्जदार कर्जदाराला भरपाई देण्यास बांधील नाही

transit accommodation= पुनर्विकास कालावधी दरम्यान रहिवाशांना प्रदान केलेल्या तात्पुरती निवास व्यवस्था

accommodation charges= निवास शुल्क

family accommodation= कुटुंब निवास

house accommodation= घर निवास

bachelor accommodation= कर्मचारी किंवा विद्यार्थी किंवा एकट्या व्यक्तीना राहण्यासाठी असलेले निवास जेथे ते कुटुंबाशिवाय राहतात

free accommodation= मोफत निवास, अशी व्यवस्था जिथे राहण्यासाठी कोणतेही भाडे न भरता राहण्याची सोय केली जाते

rent free accommodation= एक व्यवस्था किंवा निवास जेथे कोणतेही भाडे न देता राहण्यासाठी निवास व्यवस्था प्रदान केली जाते

See also  Verdict meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

staff accommodation= कर्मचारी निवास, कामगारांना राहण्यासाठीचे निवास स्थान 

arrange accommodation= राहण्याची व्यवस्था करा

office accommodation= कार्यालय निवास

guest accommodation= अतिथी निवास

accommodation expenditure= निवास खर्च

food and accommodation= अन्न आणि निवास

job accommodation= नोकरी निवास

lodging accommodation= राहण्याची सोय

power of accommodation= डोळ्याच्या भिंगाची जवळच्या आणि दूरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता

‘Accommodation’ Synonyms-antonyms

‘Accommodation’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

housing
quarters
rooms
shelter
residence
dwelling
space
arrangement
understanding
settlement
compromise
adjustment
adaptation
assimilation
integration
accord
deal
domestication

‘Accommodation’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

stubbornness
inflexibility
burden

Leave a Comment