Detention meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Detention meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Detention’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Detention’ चा उच्चार= डिटेंशन, डीटेनशन  

Detention meaning in Marathi

‘Detention’ म्हणजे एखाद्याला अधिकृतरीत्या सरकारी यंत्रणेद्वारे ताब्यात घेण्याची किंवा पोलिसांद्वारे तुरूंगात टाकण्याची कायदेशीर प्रक्रिया.

1. एखाद्याला ताब्यात घेण्याची कारवाई

2. अधिकृत प्रक्रियेद्वारे एखाद्याला ताब्यात घेतल्याची स्थिती.

Detention- मराठी अर्थ
क़ैद
ताब्यात घेणे
नजरकैद
कारावास
अडथळा
बंधन
खोळंबा
शाळा सुटल्यावर अडकवून ठेवणे
विलंब

विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाची शिक्षा म्हणून शाळा सुटल्या नंतरही त्याना शाळेतच बसवून ठेवणे. शाळेतील शिक्षकां कडून विद्यार्थ्यांना खोडकर पणाची शिक्षा म्हणून काही वेळ शाळेतच थांबवून ठेवण्याला सुद्धा ‘Detention’ म्हटले जाते.

Detention-Example

‘Detention’ एक noun (संज्ञा, नाम) आहे आणी या शब्दाचे plural noun (अनेकवचनी नाम) detention’s आहे.

‘Detention’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Police kept him in detention for three days without any proof.
Marathi: कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी त्याला तीन दिवस नजरकैदेत ठेवले.

English: On national emergency days, innocents people are kept in detention without any reason.
Marathi: राष्ट्रीय आणीबाणीच्या दिवशी निर्दोष लोकांना विनाकारण कारागृहात ठेवले जाते.

English: The government constructed new detention centers to hold illegal migrants.
Marathi: बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी सरकारने नवीन नजरबंदी केंद्रे बांधली.

English: The seized cars were still in police detention.
Marathi: जप्त केलेल्या गाड्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहेत.

English: His detention period was six months before getting bail from a court.
Marathi: कोर्टाकडून जामीन मिळण्याआधी सहा महिन्यांचा काळ तो कैदेत होता.

See also  Credentials meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

English: The court rejects the plea of police detention on the ground of his poor health.
Marathi: त्याच्या खराब आरोग्याच्या कारणावरून पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टाने फेटाळली.

English: On misbehaving, the teacher kept the student in detention for two hours after school.
Marathi: गैरवर्तन केल्यावर, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेनंतर दोन तास बसवून ठेवले.

English: She surprised me by asking, have you ever been in detention?
Marathi: तिने मला विचारून आश्चर्यचकित केले की, तू कधी कैदेत होतास का?

English: Police denied that the appellant had been assaulted in a period of detention.
Marathi: अटकेच्या कालावधीत अपीलकर्त्याला मारहाण करण्यात आल्याच्या आरोपाना पोलिसांनी नकार दिला.

English: He was kept in detention for a week by the police.
Marathi: पोलिसांनी त्याला एका आठवड्यासाठी ताब्यात ठेवले होते.

‘Detention’ चे इतर अर्थ

got detention- ताब्यात घेतले

provisional detention- तात्पुरते किंवा सशर्त ताब्यात घेणे

detention charges- अटकेचे आरोप

preventive detention- प्रतिबंधात्मक नजरकैद, प्रतिबंधक स्थानबद्धता

(preventive detention हा कायदा दंडनीय हेतूंसाठी कारावासाचा एक वाजवी प्रकार आहे)

preventive detention law- कायदेशीर कारवाई, प्रतिबंधात्मक अटकेचा कायदा

detention camp- नजरबंदी छावणी

detention center- नजरबंदी केंद्र

detention period- अटकेची मुदत, अटकेचा कालावधी

punitive detention- दंडात्मक नजरकैद, दंडात्मक क़ैद, दंडात्मक कारावास

no detention- कोठडी नाही

have you ever been in detention- आपणाला कधी कारावास झाला आहे का?

detention girl- अटकेतली मुलगी

detaining him- त्याला ताब्यात घेत आहे

detained- ताब्यात घेतले

‘Detention’ Synonyms-antonyms

‘Detention’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत. 

imprisonment
custody
arrest
house arrest
confinement
captivity
restraint
quarantine
incarceration
internment
remand

‘Detention’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

freedom
release
liberation

Leave a Comment