Abandoned meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Abandoned’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर ‘Abandoned’ चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Abandoned’ चा उच्चार = अबैन्डन्ड, अबैन्डन्ड्
Table of Contents
Abandoned meaning in Marathi
‘Abandoned’ हे एक विशेषण (Adjective) आहे.
1. अशी एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती जीला पूर्णपणे कायमचे सोडून दीले गेले आहे किंवा जीचा त्याग करण्यात आलेला आहे.
2. आवश्यक संरक्षण आणि काळजी न घेता कायमची सोडून दिली गेलेली एखादी वस्तु.
3. दुराचार करण्यात लिप्त असलेली व्यक्ती.
4. असा एक अत्यंत दुष्ट किंवा पापी व्यक्ती जो कोणत्याही नितिमत्ते शिवाय वागतो.
Abandoned- मराठी अर्थ |
वापरात नसलेला |
सोडून दिले |
निरंकूश |
बेबंद |
भन्नाट |
दुराचारी |
मालकाने कोणतीही वस्तू किंवा वास्तू काळजी न घेता कायमची सोडून दिल्याच्या कृतीला इंग्रजीमध्ये ‘Abandoned’ असे म्हणतात.
Abandoned-Example
Abandoned हा ‘Abandon’ शब्दाचा भूतकाळ आहे.
‘Abandoned’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
Eng: This dog is in bad condition because it is abandoned by its owner.
Marathi: हा कुत्रा खराब स्थितीत आहे कारण तो त्याच्या मालकाने सोडला आहे.
Eng: Nobody knows about his parents, he is an abandoned boy.
Marathi: कोणालाही त्याच्या पालकांबद्दल माहिती नाही, तो एक सोडून दिलेला मुलगा आहे.
Eng: The match was abandoned without start because of rain.
Marathi: पावसामुळे सामना सुरु न करता सोडून देण्यात आला.
Eng: He used to live a reckless and abandoned life so his parents stay away from him.
Marathi: तो एक लापरवाह आणि बेबंद जीवन जगला म्हणून त्याचे आईवडील त्याच्यापासून नेहमी दूर राहिले.
Eng: Many supporters have abandoned him because they came to knew their leader is not capable to fulfil the promises which he made during elections.
Marathi: पुष्कळ समर्थकांनी त्यांचा त्याग केला आहे कारण त्यांना हे माहित झाले होते की निवडणूकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास त्यांचा नेता सक्षम नाही.
Eng: His car was found abandoned in the forest.
Marathi: त्यांची कार जंगलात सोडून दिलेली आढळली.
Eng: After consuming wine he transforms into an abandoned man.
Marathi: दारु पील्यानंतर तो एका दुराचारी मनुष्यामध्ये बदलतो.
Eng: I intend to abandon this city after completing my higher study.
Marathi: माझा उच्च अभ्यास पूर्ण झाल्यानंतर हे शहर सोडून देण्याचा माझा मानस आहे.
Eng: His parents abandoned him to his fate.
Marathi: त्याच्या आई-वडिलांनी त्याला त्याच्या नशिबावर सोडले.
Eng: Abandoned children are the biggest problem in this city.
Marathi: सोडून दिलेली मुले ही या शहरातील सर्वात मोठी समस्या आहे.
Eng: The government has started an orphanage for abandoned children.
Marathi: सरकारने सोडून दिलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम सुरू केले आहे.
‘Abandoned’ के अन्य अर्थ
match abandoned- सोडून दिले गेलेला सामना
match abandoned without a ball bowled- एकही रन न करता सामना सोडला गेला
abandoned trademark- सोडून दिलेला ट्रेडमार्क
abandoned child- कायमचे सोडून दिले गेलेले मूल
abandoned property- वापरात नसलेली मालमत्ता
abandoned ship- कायमचे सोडून दिले गेलेले जहाज, निरंकूश जहाज
abandoned infant- कायमचे सोडून दिले गेलेले अर्भक
abandoned test- सोडून दिलेली चाचणी
abandoned dwelling- कायमचे सोडून दिले गेलेले निवास
‘Abandoned’ Synonyms-antonyms
‘Abandoned’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
stranded |
deserted |
rejected |
neglected |
ditched |
forsaken |
dumped |
uninhabited |
unbridled |
reckless |
impetuous |
unruly |
unrestrained |
‘Abandoned’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
maintain |
inhabited |
retain |
cherish |
continue |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.